नमस्कार मित्रांनो आज आपण अजिंठा लेणी मराठी माहिती म्हणजेच ajanta verul leni information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला ajintha leni history in marathi म्हणजेच ajanta caves in marathi विषयी पोस्ट सुरू करूया ……….
अजिंठा लेणी मराठी माहिती | ajanta verul leni information in marathi | ajanta caves in marathi
लेण्यासाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील हे स्थळ महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे वसलेले आहे औरंगाबाद पासून 29 किलोमीटर वर ही तुम्हाला पाहायला मिळतील. या लेण्या जवळून इला नदी वाहते, इसवीसन सहाव्या शतकापासून या लेण्यांची निर्मिती होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालूक्य आणि कलचुरी या दोन राजांच्या संघर्षात या लेण्यांचे काम पूर्ण झालं. तात्कालीन भौगोलिक परिस्थितीतूनच वेरूळच्या लेण्यांचा उलगडा होतो.

राष्ट्रकूटांच्या ताम्रपटात आठव्या शतकात या स्थळालाचा ऐलापुर असा उल्लेख केला असून याचा उतकीर्ण या लेण्यांचा उल्लेख केला आहे. पाचव्या शतकाच्या अखेरीस हरीषेण या वाकाटक सम्राटाचा मृत्यू झाल्यानंतर येथील कलावंत वेरुळ येथे गेले व त्या ठिकाणी त्यांनी वेरूळच्या लेण्यांची निर्मिती केली. येथील राजवटीने त्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिले. ही राजवट म्हणजे कलचुरी राजवट होय. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी तेराव्या शतकात, या ठिकाणी वास्तव्यास होते असा येथे उल्लेख आढळतो.
वेरुळचे सांस्कृतिक महत्व
वेरूळ हे प्रदीर्घ काळ तांत्रिक योगाचाराचे प्रमुख केंद्र होते असे दिसून येते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले, हे वेरुळचे पाटीलकी चालवत. अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी इला नदीच्या काठी घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर म्हणजे कैलास लेण्यांचा जिर्णोद्धार करून तिथल्या पुजाअर्चेची ची व्यवस्था लावून दिली. मंदिरावर मध्ययुगीन रंगरंगोटी केलेल्या खुणा स्पष्ट दिसून येतात. अगदी अलीकडे या लेण्यांच्या परिसरात सातवाहन कालीन, इसवीसन दुसरे-तिसरे शतकातील वास्तूंचे अवशेष सापडल्याची बातमी आहे. लहान-मोठी अशी 34 लेणी या भागात वसलेली आहेत. यातील बारा लेणी हे बौध्द धर्मीयांचे आहेत तर 17 लेणी हिंदू धर्मियांची असून पाच लेणी जैन धर्मीयांची आहेत.
हिंदू शिल्प प्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पशुपत संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकापासून तो चालुक्यांचा, कलचुरी वरील निर्णायक विजयापर्यंत म्हणजे, सातव्या शतकापर्यंत तो पूर्ण होतो. दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासन काळात भक्ती संप्रदायाच्या छटा दाखवणारा, तर तिसरा टप्पा त्यात प्रामुख्याने जैन येतात तो उत्तर राष्ट्रकुटाचा काळ, चौदाव्या शतकाच्या शेवटी पूर्ण होतो. यादव काळातही येथे काही काम झालेले दिसून येते. आठव्या शतकात येथे स्थापत्यकलेचा बहर अलेला दिसतो, याच काळात येथे सर्वोत्तम अशी निर्मिती झाली, बौद्ध लेणी मात्र द्रव्य कमतरतेमुळे अर्धवट राहीलेले दिसून येतात. 1 ते 12बौद्ध, 13 ते 29 हिंदू व 30 ते 34 ते जैन अशी वर्गवारी दिसून येते. यातील 16वे विख्यात असे कैलास लेणे होय.
रचना व विभागणी
1 ते 13 बौद्ध लेण्यांत खास करून विहार व भिक्षूंना निवासासाठी जागा, धम्मचक्र, बुद्धमूर्ती असलेल्या भिंती, खांबाची मंडप शिल्पे, शिल्पपट अशी अनेक देखण्या कलाकृती आपणास पाहण्यास मिळतात. यातील पाच नंबरचे लेणे भव्य असे आहे. वास्तू विज्ञानाच्या दृष्टीने सहावे देणे पाहण्यालायक आहे. यातील काही दोन मजली तर काही तीन मजली आहेत.
हिंदू लेणी
यातील 13 ते 29 ही हिंदू धर्मीयांची लेणी आहेत. यातील तेराव्या लेण्यात शिव म्हणजे शेव पंथीयांची मुद्रा जास्त दिसून येते. चौदाव्या लेण्यास रावण की खाई म्हणून ओळखले जाते, यात कैलास पर्वत हालवणाऱ्या रावणाचे व शिव-पार्वतीचे शिल्प आहे. पंधरावे लेण दशावतार लेण म्हणून प्रसिद्ध आहे, यात हिंदू धर्मियांच्या देवतांची शिल्पे आहेत, यात विष्णूने घेतलेल्या दशावतारांची माहिती आहे.
सोळावे लेणे हे कैलास लेणे म्हणून ओळखले जाते, मानकेश्वर असाही त्याचा उल्लेख केला जातो हे भव्यदिव्य असून ते या लेण्यातील मुकूटमणी म्हणून ओळखले जाते, याच्यात आधी कळस व नंतर पाया अशी अगदी वेगळी रचना पाहायला मिळते. 17 18, 19 व20 सर्वसामान्य लेणी असून त्यात उल्लेखनीय अशी वैशिष्ट नाहीत ,21वे लेणे रामेश्वर म्हणून ओळखले जाते हे लेणे मनमोहक आहे. 22, 23, 24, 25, 26, 27व 28लेणी सामान्य आहेत. यांची शिल्पकला पाहण्यासारखी आहेत.
29 वे लेणे हे सीता की नहाणी या नावाने प्रसिद्ध आहे, यातील शिल्प भव्य आहेत, मागील गर्भगृहात शिवलिंग आहे, शिवपार्वती विवाह, अक्षय क्रीडेत रमलेल्या शिवपार्वती अशी शिल्पे आहेत. जैन लेणी क्रमांक 30 ते 34 आहेत ही लेणी सुद्धा भव्य दिव्य व शिल्पकलेच्या दृष्टीने समृद्ध आहेत व ती पाहण्यासारखी आहेत. इतर लहानसहान लेणीसुद्धा या भागात पाहायला मिळतात, उदाहरणात तेली कि घाणी यात गर्भगृहात त्रीमूर्ती, मंडपात पंचअग्नी साधना करणारी उमा कोरलेली आहे, याशिवाय एक गणेशमूर्ती आहे. 29 व्या लेण्याच्या बाजूला वर डोंगरात पठारावर गणेश लेणी या नावाने संबोधल्या जाणाऱ्या लेण्यांचा समूह आहे, यातील एकात गर्भगृहात शिवलिंग व एकात गणेशाची मूर्ती आहे. तर इतरात महेश मूर्ती आहेत, ही सर्व लेणी अकराव्या व बाराव्या शतकातील असावीत,
लेण्यांना भेट देण्यासाठी प्रवासी सुविधा
औरंगाबाद शहर मोठ्या राज्य मार्गाने व शहरांशी जोडलेले आहे. येथे मुंबई, पुणे, नागपूर, गुजरात, मध्य प्रदेशातून येण्यास अनेक सुविधा आहेत. लोहमार्गाने मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद अशी सुविधा आहे. औरंगाबाद शहरापासून चिकलठाणा हा सात किलोमीटर अंतरावर विमानतळ आहे. येथे मुंबई, दिल्ली, जयपूर,उदयपूर, अशी विमानसेवा चालू आहे. हिवाळ्यातील डेक्कन ओडिसी ही राजेशाही रेल्वे राणी पर्यटकांना याची सफर घडवते. तसेच राज्य अंतर्गत मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर येथून राज्य बससेवेची व्यवस्था सुद्धा आहे.
निष्कर्ष
मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण अजिंठा लेणी मराठी माहिती म्हणजेच ajanta verul leni information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला ajintha leni history in marathi म्हणजेच ajanta caves in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….