राजमाता जिजाऊ माहिती 2021 | Jijamata Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण राजमाता जिजाऊ माहिती म्हणजेच jijamata information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला rajmata jijabai information in marathi म्हणजेच jijabai history in marathi विषयी पोस्ट सुरू करूया ……….

राजमाता जिजाऊ माहिती | jijamata information in marathi | rajmata jijabai information in marathi

राजमाता जिजाबाई हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या जेष्ठ पत्नी होत. महाराष्ट्राचा इतिहासात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, कारण त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्या रयतेच्या,दुःखावर मायेने फुंकर घालणाऱ्या मातोश्री होत्या. त्यांचे मूळ घराणे सिंदखेडचे जाधव देशमुख,त्या लखुजीराव जाधवांच्या लाडक्या कन्या,ते अत्यंत सुखवस्तू शूर जागीरदार होते.त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते.

राजमाता जिजाऊ माहिती 2021 | Jijamata Information In Marathi

त्या आपल्या आईच्या तालिमीत तयार झाल्या,त्या स्वाभिमानी, अतिशय बुद्धिमान, करारी बाण्याच्या होत्या,त्यांना वावगं अज्जिबात सहन होत नसे,यवनांच राज्य त्यांना मान्य नव्हतं,पारतंत्र्यात राहणं म्हणजे ती गुलामगिरीच ते कसलं जिणं,थोड्याश्या लोभापायी आपल्याच लोकांनी आपल्याच जिवाभावाच्या माणसांची मुंडकी छाटायची हे त्यांना मान्य नव्हत.रयतेची होणारी होळपट, त्यांनी लहानपणा पासूनच पहिली होती. जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी शिंदखेड येथे झाला. वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते.

ते बाराहजारी मनसबदार होते. वेरूळचे पाटील मालोजीराव भोसले, यांचे चिरंजीव पराक्रमी व शूर शहाजीराजें यांच्याशी, इसवी सन1610ला दौलताबाद ह्या किल्ल्यात त्यांचा विवाह झाला. त्या प्रसंगी मुर्तुझा निजामशहा हजर होता. पुढे काही कारणाने भोसले व जाधव या घराण्यांत वैमनस्य निर्माण झाले. जिजाबाई व शहाजीराजे यांचा मुक्काम सुरुवातीपासून काही वर्ष वेरूळाच होता. पुढे शहाजी आपली जहागीर सांभाळून निजामशाहीत सरदार म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत जिजाबाईंची भ्रमंती चालू होती.

जिजाबाईंचे कार्य

जिजाबाई आजूबाजूच्या सर्व घटना आपल्या डोळ्यांनी पाहत होत्या, तेंव्हाच त्यांनी मनाशी पक्क ठरवलं की आपल्या मुलांना यवनांच्या चाकरीत न ठेवता स्वतःच अस हक्काचं जे रयतेला आपलं वाटलं पाहिजे असं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. त्यांना एकूण सहा मुलं झाली. त्यापैकी संभाजी ,व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन इतिहासात प्रसिद्ध असून, अन्य चार मुले अल्पायुषी ठरली. पुढे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे अफजल खानाच्या कपटाने 1654 साली मारले गेले.पुढे जिजाबाई शहाजी राजांच्या पुण्याच्या जहागिरीत, इसवी.

सन 1636 पूर्वीच रहायला आल्या होत्या. तिथे त्यांनी राहायला लालमहाल उभारला,शहाजीराजांनी त्यांच्या सोबत आपल्या विश्वासातील काही सरदार व माणसं पाठवली होती,काही काळातच त्यांनी पुण्याची व्यवस्था चोख केली,लोकउपयोगी कामे करून लोकांना पुन्हा पुण्यात येऊन राहायचा बंदोबस्त केला.त्या रयतकार्यास प्राथमिकता देत,रयत सुखी तर राज्य संपन्न व राज्या बिनघोर असं त्या मानीत.त्यांच्या याच विचारांनी त्या रयतेच्या आऊसाहेब झाल्या.

पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बालशिवाजीना लष्करी शिक्षणाबरोबरच, रामायण महाभारत भागवत कथा सांगितल्या,व उत्तम असे संस्कार घडवले,रयतेचा राजा कसा असावा याचे उत्तम विचार त्यांनी बालशिवाजींच्या मनात निर्माण केले.म्हणूनच पुढे जाऊन राजे “जाणता राजा” म्हणजेच रयतेचा राजा म्हणून प्रसिद्ध झाले. जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीचे उत्तम व्यवस्था लावली, पुण्यात जमीन लागवडीखाली आणली, त्यांनी कसबा पेठेतील गणपतीची पूजाअर्चा नियमित सुरू केली, इतर मंदिरातही दिवाबत्तीची व्यवस्था केली.

स्वराज्य कार्य

राजकारणातील धोरणाचे त्यांना उत्तम ज्ञान होते. पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्याय निवाडे केले, याविषयी अनेक उल्लेख तत्कालीन पत्रव्यवहारात पाहावयास मिळतात. राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी येथील मार्तंड भैरव मंदिराच्या गुरवपणा विषयी तंटा निर्माण झाला, त्याचा निवाडा जिजाबाईंनी केला होता, त्यावर मातोश्री साहेब जिजाबाईंनी आश्वासन दिले आहे, तसेच ते पुढेही चालू राहील असे दिनांक 13 जुलै 1675सालच्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात.

शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत, जिजाबाई स्वराज्याच्या राज्यकारभारात त्यांच्या अखेरपर्यंत 1674, त्या जातीने लक्ष घालत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. शिवाजी महाराजांच्या मोहीम काळात त्या स्वतः राज्यकारभार सांभाळत,त्या राज्याची इतरही सर्व जबाबदारी सांभाळत असत. महाराज आग्रा भेटीवर गेले असताना त्यांनी सर्व राज्यकारभार व शिक्के,मोहर जिजाबाईंच्या हाती सुपूर्त केला होता. आग्र्यास जाताना जिजाबाईंना सहकार्य करण्याचे अभिवचन विश्वासू कारभारऱ्या कडून घेतले होते. जिजाबाई स्वाभिमानी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी त्यांचे पाचाड रायगड येथे निधन झाले.

हिंदवी स्वराज्य व रयतेच राज्य ही संकल्पना त्यांनी सत्त्यात उतरवली.त्यासाठी त्या अविरतपणे सावध व सुचेत राहिल्या,स्वराज्याचा ह्या अवघड प्रसंगी त्या पहाडासारख्या कधी जगदंबा, तर कधी महालक्ष्मी झाल्या वेळप्रसंगी महाकाली म्हणून रुद्र अवतारी झाल्या.पण ह्या स्वराज्यरूपी रयतेच्या राज्यास कधी तोशीस लागू दिली नाही.त्या उदार व मायाळू होत्या पिचलेल्या रयतेच्या त्या खऱ्या अर्थाने आई होत्या.स्वराज्यातील स्त्रियांना आधार देणाऱ्या,त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय देणाऱ्या व माजलेल्या व अबला स्त्रीयांवर हात टाकणाऱ्या पाटलाचा चौरंगा करण्याचा आदेश देण्याऱ्या निर्भीड लोकमाता होत्या.

ज्या काळात बाईला समाज चूल व मूल आणि यवन भोगवस्तू समजायचे त्या काळात निर्भीडपणे उभ राहून, यवनी सत्तांना चारिमुंडयाचित करणाऱ्या,रयत राज्याचं स्वप्न पाहणाऱ्या त्या रणमर्दानी राजमाता होत्या.त्यांनी केलेलं महान कार्य हा समाज, कधीच विसरू शकणार नाही, आणि स्वतःच्या कातडीचे जोडे करून जरी त्यांना घातले तरी त्यांचे पांग आम्ही कधीच फेडू शकत नाही, एवढं “न भूतो न भविष्याती”अस कार्य करणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या “स्वराज जननी”आहेत.त्यांना माझे शतशः नमन,।।जय जिजाऊ।।

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण राजमाता जिजाऊ माहिती म्हणजेच jijamata information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला rajmata jijabai information in marathi म्हणजेच jijabai history in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment