लोकमान्य टिळक मराठी माहिती 2021 | Lokmanya Tilak Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण लोकमान्य टिळक मराठी माहिती म्हणजेच lokmanya tilak information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला lokmanya tilak information in marathi pdf , lokmanya tilak information in marathi wikipedia म्हणजेच lokmanya tilak information in marathi language , information about lokmanya tilak in marathi विषयी पोस्ट सुरू करूया ……….

लोकमान्य टिळक मराठी माहिती | lokmanya tilak information in marathi | lokmanya tilak information in marathi pdf

आद्य भारतीय क्रांतिकारक, थोर समाज सुधारक, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्हात झाला. त्यांचे जन्म नाव केशव, परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले.त्यांच्या कुटुंबाचे मुळगाव चिखलगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी होय चिखलगावची खोतदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव हे पेशव्यांच्या पदरी होते, तिथे त्यांनी आपल्या सचोटीने चांगले नाव कमावले. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तरायुष्यात संन्यास घेतला.

लोकमान्य टिळक मराठी माहिती 2021 | Lokmanya Tilak Information In Marathi

गंगाधरपंत व पार्वतीबाई टिळकांचे आईवडील ते सामान्य ब्राम्हण कुटुंबातील होते. गंगाधर पंताना कौटुंबिक अडचणीपायी पुणे सोडून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधर टिळकांवर पारंपारिक व संस्कृतच शिक्षणाचे संस्कार घरातच झाले.

टिळकांचा सुरवातीचा प्रवास

1866 ते पुण्यात आल्यावर थोड्याच दिवसात टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदली ठाण्यात झाली. पण टिळकांनी पुण्यात राहूनच 1872 मध्ये मॅट्रिक झाले. त्यांचा कोकणातील बल्लाळ कुटुंबातील सत्यभामा बल्लाळ यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज.श्री. टिळक केसरी चे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधरपंत 1872 मध्ये निधन पावले. ते नियमित व्यायाम करायचे त्यामुळेच त्यांची प्रकृती शेवटपर्यंत सुदृढ व निकोप राहिली. कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात यांना फार मोठा उपयोग झाला.1870 मध्ये ते बी.ए.च्या, पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले मात्र ते एम.ए.होऊ शकले नाहीत अखेर त्यांनी एल.एल.बी. ही पदवी घेतली.

डेक्कन कॉलेजमध्ये टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला,दोघांनीही देश कार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला, 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. टिळक यांनी 1881मध्ये केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते उत्तम प्रकारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे कार्य येथून सुरू झाले. वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभी कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधव बर्वे यांच्यावर केसरी व मराठात अनेक लेख प्रसिद्ध झाले त्यांच्या गैरकारभारावर व इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या माहिती संबंधित त्यांनी कडाडून टीका केली, त्यावेळी टिळक यांना चार महिन्याची शिक्षा झाली.

26 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांची सुटका झाली. विष्णुशास्त्री 1882 मध्ये मरण पावले. तर टिळकांनी आपल्या मित्रांनसोबत 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना व याच संस्थेमार्फत 1885 मध्ये पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. आपला स्वाभिमान व देशनिष्ठा त्याच बरोबर स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा आहे. टिळकांना राष्ट्र आणि हिंदु धर्माचा अभिमान होता. हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, गीता यांचा अभ्यास केला होता हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत.

ज्यांना हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही ते हिंदू लोकांनी काय समाज सुधारणा कराव्या हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही असे ते म्हणत. डेक्कन एज्युकेशन संस्था सोडल्यानंतर 1890 प्रारंभीच्या काळात त्यांनी केलेले कार्य विविध स्वरूपाचे होते. ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील अन्यायावर टीका करून त्यांनी कायद्याची गरज आपल्याला प्रथम आहे हे दाखवून दिले. प्रांतिक परिषदा व काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊन, त्याचे स्वरूप जहाल राष्ट्रवादी बनवले व जनतेच्या मनात स्वाभिमान आणि चैतन्य निर्माण करून स्वातंत्र्यातून स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करणाऱ्या लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला.

देशस्वातंत्र्याचे स्फुरण जागृतकरण्याचे कार्य

स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना अर्ज व विनंत्याचे राजकारण करणाऱ्या पक्षाविरुद्ध सतत संघर्ष करावा लागला. इंग्रज उदारमतवादी आहेत, भारताचे राजकीय हक्क मान्य करतील, यावर अवलंबून न राहता संघर्ष करून “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच” या भूमिकेवर लोकांना येऊ देण्याचे कार्य हा लोकमान्यांचा संकल्प होता. केसरी व मराठातील देशाचे लेख आणि त्याचे प्रसंगोपात प्रकार भाषण आणि लोकजागृती कार्य त्यांनी प्रभावीपणे केले, तसेच समाजात त्यांनी काही सुधारण्याची सुरुवात केली. सोळा वर्षाच्या आत मुलींची व वीस वर्षाच्या मुलांची लग्न करू नयेत, कोणी कोणाला हुंडा सुद्धा देऊ नये, विधवांचे वपन न करणे इत्यादी.

1893 मध्ये हिंदू-मुस्लीम असे अनेक दंगे झाले आणि या दंगलीमागे फक्त हिंदू किंवा मुस्लीम नसून सरकार किंवा इंग्रज तिसरा पक्ष आहे हे लोकांच्या लक्षात यांनी आणून दिले व याच लोकांच्यात एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेश जयंती व शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. 1896 च्या दुष्काळात ते शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले त्याना सांगितले की पीक कमी आले असेल तर सारा माफी हा तुमचा हक्क आहे तो मागून घ्या. सरकारच्या धोरणानुसार लोकांनी हक्काने मदत मागावी.

दुष्काळाच्या मदतीसाठी नेमलेल्या कमिशन यांच्या हाताखालील गोऱ्या अधिकार्‍यांनी धुमाकूळ घातला त्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली व आपद्ग्रस्तांसाठी स्वस्त धान्य दुकाने काढली, सार्वजनिक रुग्णालये उघडली जून 1897 चाफेकर बंधूंनी जुलमी रँडचा खून केला त्यावेळी सरकारने पुन्हा जनतेवर जुलूम सुरू केला,टिळकांनी राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणाम त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. ते राष्ट्रद्रोहाची शिक्षा भोगून परत आले होते व त्यांची लोकप्रियता अधिक वाढली होती शिक्षा भोगून हे त्यांच्या ध्येयधोरणात तिळमात्र बदल झाला नाही हे त्यांच्या 4 जुलै 1800 मध्ये लिहिलेल्या “पुनश्च हरिओम” या केसरीतील अग्रलेखवरून स्पष्ट होते.

त्यानी लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीत त्याने लादलेल्या शिक्षण संस्थावरील निर्बंधावर टीका केली, शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून टीका केली व केसरीच्या अग्रलेखात आर्थिक व बौद्धिक ऱ्हास होत आहे असे निक्षून सांगितले याच, वेळी त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्यकरणी विषयी, नवीन विचार मांडले.त्यावेळी देशात लाल, बाल,पाल ही नावे प्रसिद्धीच्या शिखरावर होती.टिळकांनी नेहमीच स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या मुख्य चार सूत्रीना पाठिंबा दिला. आपली उन्नती करून घ्यायची ती स्वदेशी आणि बहिष्कार यासारख्या मार्गानी केली पाहिजे. काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ असे दोन गट पडले जहाल गटाचे नेतृत्व स्वतः लोकमान्य टिळक करत होते तर मवाळ गटाचे नेतृत्व गांधीजी करत होते. 12 मे 1908 ,9जून 1908 च्या केसरीतील अग्रलेखा मुळे परत इंग्रजांनी त्यांना देशद्रोही ठरवून सहा वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोटाऊन ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

टिळकांचा अखेरचा कार्यकाळ

टिळकांना 1916 ला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुण्यात मोठा समारंभ होऊन, त्यांना एक लाखाची थैली अर्पण करण्यात आली, ही सर्व रक्कम राष्ट्रकार्यासाठी वापरण्याची व्यवस्था करून ते म्हणाले आपली मातृभूमी सर्वांनी कोणताही भेदभाव मनात न ठेवता मुक्त केली पाहिजे याची आज शपथ घेऊया. टिळकांचे मुंबईत सरदार निवासात 1आगस्ट 1920 रोजी सकाळी निधन झाले. सुमारे पंधरा वर्षे त्यांना दम्याचा विकार झाला होता टिळकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी मुंबईत व देशभर पसरले सारा देश दुःखाच्या सागरात लोटला गेला. महात्मा गांधींनी 1ऑगस्ट हा असहकार दिन घोषित केला.

त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत सांगितले त्यांची राष्ट्रभक्ती म्हणजे आसक्ती होती, त्यांचा धर्म म्हणजे देशप्रेम,ते जन्मताच लोकशाहीवादी होते, त्यांचे जीवन म्हणजे ग्रंथच म्हणावे लागेल त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी देशहितासाठी खर्ची घातली, त्यांचे खाजगी जीवन धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ होते, त्यांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली, लोकमान्यानसारखे सातत्याने कोणत्याही व्यक्तीने स्वराज्याचे तत्व आत्तापर्यंत सांगितले नव्हते, इतिहासामध्ये त्यांचे नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सुवर्ण अक्षरांनी लिहले गेले आणि येणाऱ्या अनेक पिढया त्यांना लोकमान्य व भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रवर्तक म्हणून आदर आणि त्यांचे स्मरण युगानयुगे करत राहिल.

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण लोकमान्य टिळक मराठी माहिती म्हणजेच lokmanya tilak information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला lokmanya tilak information in marathi pdf , lokmanya tilak information in marathi wikipedia म्हणजेच lokmanya tilak information in marathi language , information about lokmanya tilak in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment