लोणार सरोवर मराठी माहिती 2021 | Lonar Lake Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण लोणार सरोवर मराठी माहिती म्हणजेच lonar lake information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला lonar sarovar history in marathi म्हणजेच lonar sarovar information in marathi विषयी पोस्ट सुरू करूया ……….

लोणार सरोवर मराठी माहिती | lonar lake information in marathi | lonar sarovar history in marathi

जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात येते.ते खाऱ्या पाण्याचे तिसरे सर्वात मोठे सरोवर असून अनेक रहस्यमय गोष्टीनी बनलेले आहे.याची निर्मिती ही पृथ्वीवर झालेल्या उल्कापातामुळे झालेली आहे. म्हणतात की लोणार सरोवराची उत्पत्ती साधारण बावन हजार वर्षांपूर्वी, पृथ्वीवर एक मोठा धूमकेतू पडल्याने झाली असावी. याचं खास वैशिष्ट्य आहे की या सरोवराचे पाणी खारं आहे हे अशाप्रकारचे जगातलं दुसरं मोठं सरोवर आहे.

लोणार सरोवर मराठी माहिती 2021 | Lonar Lake Information In Marathi

अशा अनेक विशेष रहस्यमय गोष्टींमुळे येथे दरवर्षी हजारो पर्यटक या सरोवराला भेट देतात. याची निवड जगातील अनेक सर्वोत्तम पर्यटन स्थळा मध्ये झालेली आहे, याचा इतिहास फार रोचक आणि प्रसिद्ध आहे.याचा उल्लेख भारतीय हिंदू शास्त्रातील “स्कंदपुराण” आणि “पद्मपुराणात”आढळतो याचा अर्थ हे किती प्राचीन आहे हे आपण समजू शकतो, याचा बाह्य जगासाठी सर्वात पहिला शोध युरोपचा एक अधिकारी अलेक्झांडरने1823मध्येलावला.

लोणार सरोवराची निर्मिती

हे हिंदूच एक धार्मिक स्थान आहे.या ठिकाणी मारुतीची एक चुंबकीय ताकतीची कमाल दाखवणारी एक मूर्ती सुद्धा आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकात बनलेल आहे. वैज्ञानिकांच्या मते एखादा धूमकेतू 9लाख किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने या पृथ्वीवर येऊन अदळल्याने हा एवढा मोठा खड्डा निर्माण झालेला आहे. ज्या टेकडीवर हे तलाव निर्माण झाले त्याचा आकार अंड्या सारखा गोल आहे. लोणार सरावाचे एकूण क्षेत्रफळ 3900 चौ.मीटर ,1.2 किलोमीटर आहे. लोणार महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे तिसरे सरोवर आहे. लोणार सरोवर औरंगाबाद शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. लोणार हे जगाच्या पाठीवर जी काही मोजकी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे आहेत त्यापैकी बेसाल्ट पृष्ठभागावर काळाच्या ओघात हजारोवर्षांपूर्वी निर्माण झालेलं एकमेव मोठे आघाती विवर आहे.

लोणार सरोवरची वैशिष्ट्ये

याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे, वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची हेमाडपंथी शैलीतीळ काही मंदिरे आहेत. यातील काही चांगल्या स्थितीत तर काही मोडकळीस आलेली आहेत.हे सरोवर पाहण्यासाठी शासनाने चांगली व्यवस्था केलेली आहे. येथील सरोवराचे पाणी हे कधी हिरवे कधी लाल तर कधी गुलाबी रंगाचे दिसते, हे याचे आणखीन एक वैशिष्ट्य होय, ते बहुदा सूर्य किरणांमुळे असावे.

अमेरिकेतील व भारतातील अनेक संस्थांनी या शहरावर बरेच संशोधन केलेले आहे याला महाराष्ट्राचे सातवे आश्चर्य असे सुद्धा म्हटले जाते. लोणार सरोवर काही दिवसांपूर्वी पाण्याचा रंग अचानक लाल झाल्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय ठरले. लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल का झाला यावर ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र या सरोवराचा मंगळ ग्रहाची संबंध असल्याचे सांगितले जाते. लोणार सरोवर सरोवर ची वैशिष्ट्ये प्राचीनता आणि रहस्यमय गोष्टी बद्दल जाणून घेऊया देशाप्रमाणे महाराष्ट्रातील अद्भुत गोष्टीची कमतरता नाही. त्यातीलच एक आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर, एका विशिष्ट प्रकारात बनल्या मुळेच महाराष्ट्रात असलेले हे लोणार सरोवर आशिया खंडातील पहिले आणि जागतिक स्तरावरील तिसरे सरोवर आहे.

एका सरोवरात खारे आणि गोड पाण्याचे प्रवाह आहेत असे सांगितले जाते. लोणार सरोवर 52 हजार वर्षे जुना आहे, परंतु आजच्या काळात सर्वात अचूक मानल्या जाणाऱ्या, ऑर्गण डेटिंग नुसार लोणार सरोवराची निर्मिती सुमारे पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी झाली असावी असे सांगितली जाते. 2010 मध्ये या संदर्भातील संशोधन करण्यात आले होते. पौराणिक शास्त्रानुसार किंवा तेथील स्थानिक अख्येयेकेनुसार नुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले, त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरात लोणार हे नाव मिळाले असे सांगितले जाते. प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख “विराज तीर्थ” किंवा “बैराज तीर्थ” असा केला जात असे, असे सांगितले जाते, याशिवाय या सरोवराच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत, यातील 15 मंत्री विवराचा ही मंदिरे भगवान श्रीविष्णू, दुर्गादेवी, सूर्य आणि नरसिंह देवाला समर्पित असल्याचे सांगितले जाते.

विवरांचा उतार हा 15 ते 35 अंशाचा असून पाण्याचा खारटपणा ph 10 अल्क धर्मीय आहे.येथील पाण्याचा वापर लोक शरीरावरील आजारासाठी सुद्धा करतात.सरोवराच्या काठावर विविध रंगाचे दगड सुद्धा सापडतात.येथील पाण्यापासून पूर्वी हैद्राबादचा नवाब मीठ निर्मिती करून खूप पैसे कमवायचा.नासाच्या मते बेसॉल्ट खडकातील लोणार सरोवर हे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील खड्ड्या प्रमाणेच आहे. मंगळ ग्रहावरील बेसॉल्टीक पर्वतापासून तयार झालेली सरोवरे आणि लोणार सरोवर यात बहुतांश साम्य आढळून अल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय तलावात आढळलेले जिवाणू चंद्रावरील जिवाणूंशी जवळजवळ सारखेच म्हणजे साधर्म्य असणारे आहेत असा दावा करण्यात येत आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने लोणार सरोवर

लोणार सरोवर त्याच्या विशिष्ट गुणांमुळे जागतिक पटलावर आल्याने आणि जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे सहाजिकच येथे येण्या जाण्याची किंवा राहण्याची सोय अतिउत्तम आहे.औरंगाबाद,जालना येथून जाण्यासाठी सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत.जगाच्या पाठीवर अनेक अशी आश्चर्य आहेत की त्याची उकल मानव अजून पूर्णपणे करू शकला नाही ती कायम रहस्यमय ठरली याच कारणामुळे मनुष्यात उत्कंठा ही वाढीस लागते आणि तो नवनवीन ठिकाणांना भेटी देतो आणि आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यापैकी एक हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आहे आपण याला एकदा अवश्य भेट द्यावी व आपल्या ज्ञानात भर घालावी.

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण लोणार सरोवर मराठी माहिती म्हणजेच lonar lake information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला lonar sarovar history in marathi म्हणजेच lonar sarovar information in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment