महेंद्रसिंह धोनी मराठी माहिती 2021 | Mahendra Singh Dhoni Information In Marathi Language

नमस्कार मित्रांनो आज आपण महेंद्रसिंह धोनी मराठी माहिती म्हणजेच mahendra singh dhoni information in marathi language बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला dhoni information in marathi language , dhoni information in marathi म्हणजेच information about ms dhoni in marathi विषयी पोस्ट सुरू करूया ……….

महेंद्रसिंह धोनी मराठी माहिती | mahendra singh dhoni information in marathi language | ms dhoni information in marathi language

सर्वास यशस्वी भारतीय कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी याच्याकडे पाहिले जाते.त्याचाच नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा 2011चा, एकदिवसीय वर्ल्डकप आणि 2007 चा, 20-20 चा वर्ल्डकप जिंकून क्रिकेटचे जगजेत्ते आपण आहोत हे जगाला दाखवून दिले.एका सामान्य कुटुंबात व खेडेगावात जन्मलेल्या ह्या मुलांन लाखो रुपये लावून व मोठमोठया क्रिकेट अकादमीत शिकून जे त्यांना जमले नाही ते ह्या मुलाने करून दाखवले.

महेंद्रसिंह धोनी मराठी माहिती 2021 | Mahendra Singh Dhoni Information In Marathi Language

धोनी हा त्याच्या खेळामुळे व स्वभावामुळे खुपच प्रसिद्ध झाला.महेंद्रसिंग धोनी हा आपल्या खडतर मेहनतीने जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला आहे. ज्याची वार्षिक कमाई साधारण 200 कोटी ते 210 कोटी इतकी आहे.देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या चेन्नई संघाचा तो कायम कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वात हा संघ 3 वेळा विजेता राहिला आहे.

महेंद्रसिंग धोनी व त्याचे बालपण

थोडासा लाजाळू व मितभाषी असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 बिहार येथे झाला. धोनी हा माही या नावाने खूप प्रसिद्ध आहे. धोनीला जगातील सर्वात श्रेष्ठ फिनिशर म्हणून ओळखले जाते.धोनीला 2007 मध्ये राजीव गांधी “खेळ रत्न” पुरस्कार, 2009मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार “पद्मश्री” आणि 2018 मध्ये भारताचा तिसरा सर्वात मोठा नागरी पुरस्कार “पद्मभूषण” ने सन्मानित करण्यात आलेल आहे. इंडियन आर्मीनेसुद्धा 1 नोव्हेंबर 2011 रोजी धोनीला “लेफ्टनंट कर्नल” ही मानद पदवी प्रधान केली आहे.धोनीच मुळगाव हे उत्तराखंड राज्यातील “लावली” हे असून अल्मोडा जिल्ह्यामध्ये येते. दोन्हीचे आई-वडिल नोकरीनिमित्त उत्तराखंड येथून रांची झारखंड येथे कायमस्वरूपी स्थलांतरित झाले. धोनीला एक बहीन व एक भाऊ आहे.

महेंद्रसिंग धोनीचे आदर्श

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍडम गिलक्रिस्टचा तो खूप मोठा चाहता आहे,त्याचा खेळ त्याची ऊर्जा पाहूनच तो क्रिकेट या खेळाकडे आकर्षित झाला. धोनी लहानपणापासूनच क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखल जात त्या महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनयाचे बादशाह बॉलिवुड अभिनेता अमिताभ बच्चन आणि गाणं कोकिळा म्हणून अख्ख जग ज्यांना ओळखत त्या महान गायिका लता मंगेशकर या तीन “महारत्नाना” तो आपला आदर्श मानतो. धोनीने डीबीए जवाहर विद्या मंदिर श्यामली रांची, येथून दहावी पर्यन्तचे शिक्षण घेतलेल आहे, तो शालेय जीवनापासूनच बॅडमिंटन आणि फुटबॉल मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करायचा, याच्यात तो जिल्हापतळीवर खेळलेला आहे व त्याच्यात त्याने अनेक पुरस्कार सुद्धा मिळवलेत.त्याची उत्कृष्ट गोलकीपिंग पाहून क्रिकेटक्लब प्रशिक्षक दिग्विजय सिंह ठाकूर यांनी त्याला,स्थानीय क्रिकेट क्लबच्या अकादमीत यष्टीरक्षक म्हणून खेळण्यास भाग पाडले. त्याच्या यष्टीरक्षण कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले.

धोनीचे भारतीयक्रिकेट मधील योगदान

आजपर्यंतचे यष्टीमागील सर्व जागतिक विक्रम त्याचा नावे आहेत,यावरूनच दिसून येते की त्याने भारतीय क्रिकेटला किती मोठ योगदान दिलंय. त्याच्याच कालकीर्दीत भारत ही क्रिकेटची महासत्ता म्हणून नावारूपाला आली.त्याने अनेक विजय आपल्या नेतृत्वात भारताच्या नावे केलेत, त्याच्या संयमी शांत आणि चाणाक्ष नेतृत्व गुणाना खरंच तोड नाही.”न भूतो न भविष्यती” असा असामान्य खेळाडू भारताला पुन्हा मिळणे शक्य नाही.भारताने सार्वकालिक जे काही क्रिकेटपट्टू या क्रिकेट जगताला दिले त्यात महेंद्रसिंग धोनी या कोहिनुर हिऱ्याच्या खूप वरचा क्रमांक लागतो. 1997 च्या सीजनमध्ये त्याची विनू माकंड ट्रॉफी अंडर16 साठी निवड केली गेली.

सुरुवातीच्या काळात तो रेल्वेच्या खडगपुर रेल्वे स्टेशन वर 2001 ते 2003 पर्यंत तिकीट तपासनीस म्हणून काम करत होता. धोनीने आपली बालपणीची मैत्रिण साक्षीच्या जोडीला डेहराडून येथे 4 जुलै 2013 लग्न केलं, या लग्नात खूप सार्‍या प्रसिद्ध लोकांनी भाग घेतला होता. धोनीने 18 वर्षाच्या वयातच 1990, 2000 मध्ये बिहार कडून रणजी ट्रॉफीमधून खेळायला सुरुवात केली. त्याने सुरुवातीलाच आसामविरुद्ध 68 धावांची दमदार खेळी करून आपली छाप पाडली. तो 22 डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना खेळला, पहिली टेस्ट श्रीलंका विरुद्ध 2006 मध्ये, आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो पहिला टी-20 चा सामना खेळला.धोनीने भारताकडून खेळताना 90 टेस्टमध्ये 38.09 च्या सरासरीने 4870 रन बनवले आहेत, ज्यामध्ये 6 शतक,33 अर्धशतक, 256 झेल पकडलेले आहेत आणि 38 स्टंप आउट केलेले आहेत.

348 एकदिवसीय सामन्यात 50.58 सरासरीने 10723 धावा बनवल्या, त्यामध्ये 10 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे, 317 झेल पकडले असून 122 स्टम्पिंग केले आहेत. 98 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना त्याने 37.60 सरासरीने 1617 धावा बनवल्या, त्याच्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.भारतीय संघात धोनीची निवड झाली त्या वेळी संघाचा कर्णधार होता सौरभ गांगुली,त्याने ह्या रांगड्या चपळ खेळाडूचे गुण पहिलाच सामन्यात हेरले व त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न केला. धोनीनेही त्याच्यावरच हा विश्वास सार्थ ठरवला आपल्या कर्णधाराला नाराज केले नाही.कितीतरी वेळा तो संघाचा तारणहार ठरला.जागतिक क्रिकेटमध्ये त्याचा एक पसंतीचा फटका व चेंडूला मैदानाबाहेर भिरकवणार हुकमी अस्त्र म्हणजे “हेलिकॉप्टर शॉट” होय आणि तो फक्त धोनीनेच खेळावा एवढा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

तो मैदानात उतरला की, प्रेक्षक अख्ख मैदान माही,– माही— या नावाचा जयघोषाने डोक्यावर घ्यायचे.लांब केसाचा तो बहारदार शरीराचा लाजाळू खेळाडू ,कोणत्याही यशाचं श्रेय न घेणारा, पराजयाच विजयात रूपांतर करणारा, कधीही नाराज व हताश न होणार हा मितभाषी खेळाडू, आपल्या संघाच्या व देशाच्या यशासाठी जवळ जवळ15 वर्ष क्रिकेट खेळला.क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन खऱ्याअर्थाने ह्या खेळाडूने बदलून टाकला.सतत विजयी होऊन देशाचं नाव उंचावण्यासाठी प्रयत्न त्याने केला.क्रिकेट बद्द्ल प्रेम निर्माण केलंच,परंतु सचोटी आणि परिश्रम केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याची शिकवनही त्याने आपल्या खेळातून, इतर सहकारी खेळाडू व देशवासियांना दिली.कांही शतकातून असा खेळाडू जन्माला येतो,त्याने खेळातून केलेल्या देशसेवेल सलाम.

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण महेंद्रसिंह धोनी मराठी माहिती म्हणजेच mahendra singh dhoni information in marathi language बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला dhoni information in marathi language , dhoni information in marathi म्हणजेच information about ms dhoni in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment