नागपंचमी मराठी माहिती 2021 | Nag Panchami Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण नागपंचमी मराठी माहिती म्हणजेच nag panchami information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला nag panchami information in marathi language म्हणजेच nag panchami in marathi विषयी पोस्ट सुरू करूया ……….

नागपंचमी मराठी माहिती | nag panchami information in marathi | nag panchami information in marathi language

श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात म्हणून या दिवसास नागपंचमी म्हणतात.या वर्षी 13ऑगस्ट2021रोजी नागपंचमी हा सण आपल्याकडे साजरा होईल. भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे कृष्णायणात कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे मर्दन केले व या दिवशी तो डोहातून विजय होऊन नागासह वर आला तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पुजा केली, अशी कथाही सांगितली जाते. नाग हे द्रविड लोकांच्या दैवत होते पण आर्य व द्रविड यांच्या मिश्रणाने नंतर नागाची पूजा सर्वत्र सुरू झाली असे म्हणतात. मनुष्य नागाला फार घाबरतो म्हणून त्याला त्रास देणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हा अति विषारी व भयंकर प्राणी आहे, म्हणून वर्षातून एक दिवस त्याची पूजा केली तर त्यापासून भीती राहणार नाही, या भावनेने श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी, नागाची पूजा प्रचलित झाली असावी.

नागपंचमी मराठी माहिती 2021 | Nag Panchami Information In Marathi

नागपंचमीचे महत्त्व व श्रद्धा

महाराष्ट्रात हा सण मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो खास करून कोकणात या सणाला फार महत्त्व आहे,या दिवशी कोकणात वारूळाच्या मातीची नागाची प्रतिमा करून, त्याची पूजा करतात.इतर ठिकाणी गारुडी लोक खरे नाग घेऊन घरोघरी हिंडतात, लोक नागाला दूध व लाह्या असेपदार्थ वाहून त्याची पूजा करतात या दिवशी दिवसभर स्त्रिया व मुली नागदेवतेला आपला भाऊ मानून उपवास करतात, संध्याकाळी गावातील शिवमंदिरात जाऊन नागाची व वारुळाची पूजा करतात.तस पाहिलं तर नाग हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे.तो उंदरापासून भात शेतीचे रक्षण करतो.नागपंचमी दिवशी जमीन नांगरणे भाज्या वगैरे कापणे या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. या दिवशी घरातील स्त्रिया व मुली गाणी गाणे,वारुळाभोवती फेर धरून फुगड्या घालणे, झोपाळे बांधून खेळत आनंदाने साजरा करतात.या दिवसापासूनच श्रावणातील व महाराष्ट्रातील आनंदी सणांची सुरवात होते.

इतर ठिकाणी सण साजरा करण्याच्या पद्धती:- भारतात सर्व प्रांतात हा सण साजरा करतात. काशीमध्ये नागकुप नावाचे तीर्थ आहे, विद्वान पंडित या दिवशी शास्त्रचर्चा करतात आणि नागकुपावर जाऊन नागाची पूजा करतात तसेच प्रसिद्ध वैयाकरण पंथजली हा शेषाचा अवतार असून त्याचे वास्तव्य नागकुपातआहे अशी समजूत त्यामागे आहे.बंगालमध्ये सर्पदेवता मनसादेवीची, तर राजस्थानमध्ये पिपा,तेजा इ.देवाची पूजा करतात.प्रदेशानुसार या दिवशीच्या नागपूजनात विविधता आढळते. नागपंचमी नावाचे स्त्रियांनी आचरावयाचे एक व्रत आहे.”आनंत”,वासुकी,असे हे व्रत होय.

त्यात अनंत वासुकी नागाची पूजा करून उपवास करतात संध्याकाळी नागाची पूजा करून उपवास सोडतात. उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणास गाय व सोन्याचा नाग दक्षिणा म्हणून देतात, या व्रताच्या अनेक कथा प्रचलित आहेत,व्यायलेली दुभती गाय, मालकास न कळता नागराज्याला तृप्त करण्यासाठी गावाबाहेरील शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करते ही त्यातील सर्वात प्रसिद्ध लोककथा,चुकून शेतकऱ्याच्या हातून नाग मारला जातो व शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या कुटुंबाचे दुखावलेल्या नागिणीपासून,नागदेवाची पूजा मांडून प्राण वाचवणे ही दुसरी कथा, आशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत. इतर सणाप्रमाणे या सणाशी निगडीत अशी सुंदर लोकगीते व इतर लोकसाहित्य मराठीत आढळते.

बत्तीस शिराळा येथील नागपंचमी

सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला 32 शिराळा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून मात्र पूर्व परंपरेनुसार हा उत्सव म्हणावा तसा साजरा होत नाही,यात आता बऱ्याचशा कायदेशीर बाबींचा अटकाव आहे.काळाच्या ओघात जुनी प्रथा बंद करत असताना, बत्तीस शिराळ्यातील. पुणे-बंगलोर महामार्गावर कोल्हापूर कडे जाताना पेठ नका पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो, तेथून साधारण वीस किलोमीटरवर बत्तीशिराळा वसलेले आहे. बत्तीशिराळा पासून जवळच चांदोली अभयारण्य व चांदोली धरण आहेत, पूर्वी नागपंचमीचा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा.

एक महिना अगोदर येथील मंडळीं नाग पकडण्याच्या, मोहिमेत हातात लांब काठी व नाग ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन 5 ते 7 जणांचे ग्रुप मोहीम फत्ते करण्यास निघायचे. नागपंचमी उत्सव संपेपर्यंत पकडलेल्या सापांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.नागपंचमीच्या दिवशी गावात गावदेवीची पूजा करून साधारणपणे शंभर ते सव्वाशे नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जायची, त्यानंतर नागाचे खेळ होत,मोठा फणा, व सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळाना बक्षिसे मिळत, शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती.

नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे, परंतु सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग वन्यजीव प्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि वन्यजीवन संरक्षण कायद्यानुसार 2002 मध्ये,आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे, तसेच मिरवणूक काढणे,प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धाना बंदी घातली.आशा प्रकारे चांगल्या सण उत्सवांना, वाईट प्रसार प्रचाराने,बंदी येणे किंवा गालबोट लागण्याचे प्रकार दिवसंदिवस वाढत आहेत.आपणच आपल्या सण किंवा उत्सवांना बदनाम होण्यापासून वाचवले पाहिजे, ते आपली राष्ट्रीय संपत्ती किंवा ठेवा आहेत.

आशा विविध संस्कृति व परंपरेने नटलेला हा भारत देश हीच आपली जागतिक ओळख.ती आपण प्राणपणाने जपली पाहिजे.त्याचे अवडंबर माजता कामा नये.हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.यातूनच काही अंशी आपणास पर्यटन दृष्ट्या फायदाच झाला आहे.याचा आपण पुढील लेखात संदर्भ घेऊ व लिखाण करू.

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण नागपंचमी मराठी माहिती म्हणजेच nag panchami information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला nag panchami information in marathi language म्हणजेच nag panchami in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment