पाटील विषयी माहिती 2022 | Patil in marathi

Patil in marathi : आपल्याकडे महाराष्ट्रात पाटील ही आडनावे मोठ्या प्रमाणावर आढळतात.. पाटील हे आडनाव एका हुद्द्यावरून पडले हे आपणास माहिती असेलच परंतु नेमके पाटलाचे काम काय होते हे माहिती नसेल तर हा लेख नक्की वाचा..!

गावावरील कर गोळा करण्याचे काम पाटील (उर्फ मोकदम) करीत असे. कराच्या उत्पन्नातील मुख्य बाब शेतीवरील कर ही असे. येणाऱ्या पिकापैकी सुमारे तेहेतीस ते पन्नास टक्के हिस्सा धान्यादी वस्तूंच्या रूपाने किंवा त्याच्या किंमतीच्या रूपाने शेतीवरील कर म्हणून द्यावा लागे. शेतीवरील कर, इतर लहानसहान कर, बलुत्यांना मोबदला म्हणून द्यावयाचे बलुते, इत्यादी देणी देऊन टाकल्यावर पिकाचा जो हिस्सा उरेल तो शेतकऱ्याला मिळे.

पाटील विषयी माहिती | Patil in marathi | Patil information in marathi

Patil in marathi

गावातील शेतजमिनीच्या निरनिराळ्या तुकड्यांमध्ये निरनिराळे शेतकरी (म्हणजेच कुळे, कुणबी, प्रज,मुजेरी) शेती करीत असत. गावातील जास्तीत जास्त जमिनीवर कुळे नेमून ती लागवडीखाली आणणे, कुळांकडून शेतीची कामे वेळच्या वेळी करवून घेणे आणि पिके आल्यावर कर वसूल करणे ही जबाबदारी पाटलाची असे.

कधीकधो युद्ध, दुष्काळ, इत्यादी कारणांमुळे कुळे गाव सोडून निघून जात. अशा वेळी कुळांना दिलासा देऊन पुन्हा गावावर आणणे आणि ज्या जमिनीवर कुळे नसतील त्या जमिनीवर नवीन कुळे नेमणे हे काम म्हणजेच गाव लावण्याचे काम पाटलाला करावे लागे.

जर अपेक्षित कर वसूल झाला नाही तर त्याला त्यातील तूट स्वत:च्या खिशातून किंवा कर्ज काढून भरून काढावी लागे. अशी तूट तो भरून काढू शकला नाही तर मुकासदार किंवा मुकासदाराने परगण्यावर नेमलेले अधिकारी पाटलाला कैदेत टाकीत.

पाटलाला त्याच्या कामात कुलकर्णी, चौगुला आणि महार असे तीन मदतनीस असत. कुलकर्णी करांचे हिशोब ठेवण्याचे आणि गावाविषयीचे इतर लिखापढीचे काम करीत असे, चौगुला कर गोळा करण्याच्या कामात पाटलाला मदत करीत असे आणि महार हा गावाचा शिपाई आणि गावाच्या सीमांचा राखणदार म्हणून काम करीत असे.

साभार-:भटकंती

Leave a Comment