सज्जनगड विषयी मराठी माहिती 2021 | Sajjangad Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण सज्जनगड विषयी मराठी माहिती म्हणजेच sajjangad information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला sajjangad fort information in marathi म्हणजेच sajjangarh satara विषयी पोस्ट सुरू करूया ……….

सज्जनगड विषयी मराठी माहिती | sajjangad information in marathi | sajjangad fort information in marathi

सातारा जिल्ह्यातील, सज्जनगड हे महाराष्ट्रातील समर्थ संप्रदायाचे पवित्र क्षेत्र. लोकसंख्या साधारण 2000 हजाराच्या आसपास, सातारा शहराच्या नैऋत्येस सुमारे दहा किलोमीटर, उरमोडी नदीच्या खोऱ्यात परळी गाव आहे, ते शिलाहारांच्या अधिपत्याखाली अकराव्या ते बाराव्या शतकात होते. येथील शिलाहार काळातीळ एक शिलालेख पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळ ग्रंथालयात आहे. येथील हेमाडपंती मंदिरापैकी एक महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे, त्याचे नक्षीकाम स्तंभ व द्वारावरील वैशिष्ट्यपूर्ण असून, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस कामशिल्पे आहेत.

सज्जनगड विषयी मराठी माहिती 2021 | Sajjangad Information In Marathi

येथे दिपमाळाही आहेत, त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या एका फाट्यावर 318 मीटर उंचीचा “सज्जनगड” असून त्याचा परीघ 1668 मीटर आहे. गडाला सुमारे 750 पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार आहे. जवळजवळ तेथपर्यंत गाडी रस्ताही तयार झाला आहे. सातार्‍याहून परळी सज्जनगड जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांची सोय आहे. किल्ल्यावर श्री समर्थ मठ असून, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दिलेला पलंग, भांडी, तसेच समर्थांची कुबडी, काठी, तसबीर इत्यादी वस्तू ठेवलेल्या आहेत. गडावर श्रीराम मंदिर व त्याच्या गाभाऱ्याखाली समर्थांची समाधी असून परिसरात समर्थानी स्थापित केलेली हनुमान व आंगलाई देवी यांची मंदिरे आहेत.

दोन पाण्याची तळी आहेत माघ प्रतिपदा ते वद्य नवमी, दासनवमीला इथे मोठी यात्रा भरते. शिवाय रामनवमीचा उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गडावर यात्रेकरूंसाठी प्रशासनाणे धर्मशाळा बांधली असून, तेथे रामदासी सांप्रादा यकांची व इतर यात्रिक यांची वस्ती असते. हा किल्ला शिलाहार राजा पहिला भोज याने बांधला असावा, तथापि येथील बहुतेक अवशेष आदिलशाही व मराठिसत्तेकालीन असून येथे असलेल्या सतराव्या शतकातील दोन पारशी लेखात यास किल्ले परेली असे म्हटले आहे. 1673 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला,समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज हे गुरुशिष्य जोडी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत.स्वराज्याच्या अनेक काठीणप्रसंगी महाराजांना समर्थांचा सल्ला मोलाचा ठरला आहे.

समर्थांच्या वयानुसार त्यांना दगदग सहन करावी लागू नये म्हणून महाराजांनी या किल्ल्याची वेवस्थित डागडुजी करून,तो त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठी दिला.महाराजही अधूनमधून समर्थांकडे यायचे,काही काळ संभाजी महाराजही समर्थ आज्ञेने येथे राहिले होते.महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास येथे राहू लागले.समर्थ रामदासांनी प्रमुख संत मंडळीना जमवून येथे रामाचा मोठा उत्सव केला व या किल्ल्याचे सज्जनगड असे नाव ठेवले असे म्हणतात, तर काहींच्या मते शिवाजी महाराजांनी यास समर्थ रामदासांच्या वास्तव्यामुळे सज्जनगड असे नामकरण केले असे सांगतात. समर्थांच्या निधनानंतर 1681 साली छत्रपती संभाजीराजे यांच्या आज्ञेवरून, रामचंद्र पंत अमात्य यांनी येथील राम मंदिराचा विस्तार केला या क्षेत्रस्थानास स्वतः शिवाजी महाराजांनी परवानग्या लिहून दिल्या आहेत. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला औरंगजेबाने जिंकून रागाने त्याने येथील अनेक वास्तूंची नासधूस केली.

शाहू महाराजांचं राज्य सुरू झाल्यापासून हा किल्ला सतत मराठीशीतच होता. सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत प्रतापगडाचा सोबती म्हणून वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून साधारण तीन हजार फूट उंच आहे तर पठारापासून एक हजार फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती दिसतो. पश्चिमेस खेड चिपळूण, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड दक्षिणेकडे कळम, सातारा शहर, अजिंक्यतारा आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पावन वास्तव्याने या गडास सांस्कृतिक वारसा प्राप्त झाला आहे.

चढण्यासाठी पायऱ्या आहेत, अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याणस्वामी यांचे मंदिर आहे, पुढे गेल्यावर एका बाजूला मारुतीचे, दुसऱ्या बाजूला गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजा श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या मारुती व वरहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या अंगाला या आंगलाई देवीचे मंदिर आहे, अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांणा श्रीरामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती, हे मंदिर समर्थांनी बांधले शके 1603 रोजी माघ नवमीला रामदासांनी समाधी घेतली, म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसून शिष्यांनी देऊळ बांधले.

गडावरील ऐतिहासिक वास्तू

राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मुर्ती आहे. मुख्य मंदिरात राम-लक्ष्मण-सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत, जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे, बाजुला समर्थांचे समाधिस्थान आहे. गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे म्हणतात, नंतर दुसरे द्वार आग्नेय दिशेस आहे, तो दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थद्वार असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात, दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो, गडावर पायऱ्या चढून गेल्यावर झाड लागते या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते त्या वाटेने पाच मिनिटे पुढे गेल्यावर एक घळ लागते हीच ती रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती.

याच ठिकाणी त्यांनी अध्यात्मातील ग्रंथराज “दासबोध”या अमूल्य ग्रंथाची रचना केली.गडावर प्रवेश केल्यावर डावी कडे वळावे समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठी घोडाळे तलाव दिसते तळ्याच्या मागच्या बाजूस एक इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. जी मूर्ती समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली,गडावरील समर्थ रामदासांची समाधी व समर्थांच्या निर्वाणानंतर श्रीराम मंदिर यांचे बांधकाम छत्रपती संभाजीराजे यांनी केलेले आहे.गडावर अशोकवन,वेनाबाईवृंदावन, अक्कबाईवृंदावन,आणि समर्थमठ या वास्तू आहेत.कल्याण स्वामी ज्या मोठ्या हंड्याने पाणी भरायचे तो हंडाही पाहायला मिळतो.समर्थांच मेरुस्वामीनी प्रत्यक्ष काढलेलं चित्रही येथे पाहायला मिळत.

सज्जनगडाचे महत्त्व

स्वराज्य निर्मितीच्या काळात महाराजांना समर्थांच खूप सहाय्य झालं,मराठा तितुका मेळवावा।महाराष्ट्र धर्म वाढवावा।।,सामर्थ्य आहे चळवळीचे। जो,जो करील तयांचे।।, केल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहिजे।।, या आपल्या शिकवणीतून अनेक माणसं त्यांनी स्वराज्यकार्यास जोडली.अश्या थोर संतांच्या सानिध्याने पावन झालेल्या ह्या पावन भूमिस आयुष्यात एकदातरी भेट द्यावी,हेच आपले भाग्य.सज्जनगडास जाण्यासाठी ,पुणे,सातारा,कोल्हापूर,कोकणातून महाड व चिपळूण येथून महाराष्ट्र परिवहन महामंडळाची व खाजगी वाहतुकीची चांगली व्यवस्था आहे.आता पर्यटनाच्या दृष्टीने गडावर चांगली सुधारणा करण्यात आली आहे. राहण्याची व जेवणाची सुद्धा चांगली व्यवस्था आहे.।।जय जय रघुवीर समर्थ।।

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण सज्जनगड विषयी मराठी माहिती म्हणजेच sajjangad information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला sajjangad fort information in marathi म्हणजेच sajjangarh satara ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment