संत नामदेव मराठी माहिती 2021 | Sant Namdev Information In Marathi Language

नमस्कार मित्रांनो आज आपण संत नामदेव मराठी माहिती म्हणजेच sant namdev information in marathi language बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला sant namdev information in marathi म्हणजेच sant namdev in marathi , information about sant namdev in marathi विषयी पोस्ट सुरू करूया ……….

संत नामदेव मराठी माहिती | sant namdev information in marathi language | sant namdev information in marathi

संत नामदेव मराठी माहिती 2021 | Sant Namdev Information In Marathi Language

महाराष्ट्रातील 12व्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर माऊलींना समकालीन असणाऱ्या,घरची वारकरी परंपरा असणाऱ्या कुटुंबात संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला.

समाज कार्य

लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंग त्यांचे सर्वकाही होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत या बालकाच्या भक्तीपायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. भागवत धर्माचे प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधीनंतर सुमारे पन्नास वर्ष भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. ज्या काळात भारतात बाह्य,यवनी शक्तींनी अमानवीय कृत्यांची परिसीमा गाठली होती, अश्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची व देशाची एकात्मता जपण्याचे अवघड कार्य आपल्या खांद्यावर घेण्याचे व निभावण्याचे काम त्यांनी त्या काळी केले.

तळागाळातील गांजलेल्या व दुःखाने पिचलेल्या समाजाला अधार देण्याचे महान कार्य त्यावेळी त्यांनी केले,म्हणूनच जातीधर्माच्या भिंती पलीकडे ते सर्वाना आपलेसे वाटतात. पांडुरंगाची वारी करणाऱ्या भागवत संप्रदायाचे, व नामविद्येची प्रथम सुरवात झालेल्या महाराष्ट्रातील ते एक थोर संत होत. आपल्या भक्ती भावनेने भरलेल्या कीर्तनात ते स्वतः पांडुरंगालाही नाचायला व डोलायला लावणारे अशी त्यांची भक्ती होती. संत नामदेव हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते.एवढेच नाही तर ते पांडुरंगाचे अत्यंत प्रिय सखा होते असे मानले जाते. देशभरातील समाजप्रबोधन :- संत नामदेव हे भागवत धर्माचे व वारकरी परंपरेचे महान प्रसार व प्रचारक असून, भारतभर त्यांनी त्या काळात धार्मिक एकात्मता साधली.

भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाणारे ते पहिले संत होय,म्हणूनच त्यांना भागवत धर्माचे प्रसारक व प्रचारक मानतात . संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान देव, मुक्ताबाई, नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर, आदी संतांचा मेळा जमला होता, यानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच “भगवतगीतेची” गंगा मराठीत आणली होती त्यातून नामदेवांना आपल्या कामासाठी तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळाले होते. कुशल संघटक असणाऱ्या निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना एकत्र यावे असे वाटणे स्वाभाविक होते.

त्यासाठी वयाने आणि तत्वनिष्ठेने सुद्धा जेष्ठ असून ते आळंदीला गेले. संतांच्या संमेलनामधील चर्चा ऐकून, नामदेवांना भगवंत कार्यासाठी अधिक ज्ञानाची गरज वाटू लागली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन इतरांकडून देवाच्या सगुण निर्गुण स्वरूपाविषयी स्पष्टता मिळवली. नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला आला होता.हा ज्ञान आणि भक्तीचा संगम होता, त्यातूनच “नाचू कीर्तनाच्या रंगी,ज्ञानदीप लावू जगी” देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावशाली संगतीत,सगळी संतपरंपरा एकत्र झाली.

त्यांनी देशभर फिरून देश पिंजून काढला, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि पंजाब पर्यंत हे संत गेले, माणसाला माणूस शोधून त्याला,खऱ्या मनुष्य धर्माची ओळख करून देण्याची ही धडपड होती. नामदेव कीर्तन करत, चोखामेळा टाळकरी होऊन त्यांना साथ देत, जनाबाई कीर्तनाचे संचलन करत, गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार जगमित्र नागा नरहरी सोनार, दासी जनी, सगळे त्यात होते. पंजाबातून जालना सुतारी, पंढरपुराकडे सोबत आलेले हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजाचे, धार्मिक वैचारिक आणि सामाजिक नेते होते.

ग्रंथसाहित्य व शिष्य उभारणी कार्य

संत नामदेवांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना केली, त्यातील सुमारे 62 अभंग “नामदेव जी की मुखबानी” नावाची शिख पंतांच्या “गुरुग्रंथसाहेब” मध्ये गुरुमुखी लिपीत घेतली आहेत. संत नामदेवांनी आपल्या ग्रंथातून सुरवातीच्या तीन अध्यायांत ज्ञानेश्वरमाऊलींचे महत्व सांगितले आहे. संत नामदेवांनी हिंदी साहित्याला नवे भान दिले. त्यांच्या कामातून पुढे रामानंद ,कबीर, नानक, नरहरी मेहता अशी संतांची पिढी पंजाबात आणि देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकाहून अधिक काळ राहिले.

नामदेवांचा देशभर यावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाब बरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यात त्यांची मंदिरे आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षी इतके मोठे महान कार्य मागे ठेऊन, अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला.त्यांचा परिवार मोठा होता ,त्यांना चारमूल व एक मुलगी असा त्यांचा संसार गाडा होता. वडील दामाशेट व गोणाई त्यांची माता.ते जातीने शिंपी होते. दामाशेटचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता, अगोदरच्या सातव्या पिढीतील.

सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील “नरसी-बामणी” हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. संत नामदेवांना ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले.त्यांनी आपले संपूर्ण बालपण हे पंढरपुरात घालवले, त्याना लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागली होती.तिथेच ते पांडुरंगाचे लाडके भक्त झाले त्यांनी पांडुरंगाची अनन्यसाधारण भक्ती केली. संत नामदेवाचे अभंग गाथा अशी मिळून सुमारे 2000 ते 2600 अभंग प्रसिद्ध पावले आहेत. नामदेव कीर्तन करीत तेंव्हा खुद्द पांडुरंग त्यांच्या कीर्तनात नाचत असे अशी आख्यायिका सांगितली जाते. ते कीर्तनातून समाज प्रबोधन करत.

।नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। हे त्यांनी शेवटपर्यंत आपल्या मानवीआयुष्याचे ध्येय ठेवले होते. पंजाब मधील शीख बांधवांना त्यांच्या बद्दल खूप आदर वाटतो ते त्यांना आपले वाटतात. शीख बांधव “नामदेव बाबा” म्हणून त्यांचे आदराने गुणगान गातात. पंजाबातील व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात कमालीचे साधर्म आहे. घुमान पंजाब येथे त्यांचे मंदिर उभारले आहे. पंजाबात बहोरदास लध्धा, विष्णुस्वामी, व केशव कलाधारी अशे अनेक पंजाबी शिष्य त्यांचे कार्याने प्रभावित होऊन तयार झाले. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवांची मंदिरे उभारली आहेत.

संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.ज्ञानदेवे रचिला पाया।नामदेवे सांधियल्या भिंती।तुका झालासे कळस।। अस म्हनायला काहीच हरकत नाही एवढं त्यांचं महान कार्य आहे.आपल्या लाडक्या पांडुरंग भक्तांच्या व त्याच्या नामजप करणाऱ्या अनेक संतांच्या चरण धुळीचा आपल्या कपाळी स्पर्श व्हावा म्हणून, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या, मुख्य पायरीचा दगड होऊन तेथे अजरामर होण्यात त्यांनी धन्यता मानली.हे थोरसमाज सुधारक संतनामदेव शके 1272 मध्ये आपले महान कार्य मागे सोडून पंढरपूरी कायमचे पांडुरंग चरणी विलीन होऊन समाधिस्थ झाले.

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण संत नामदेव मराठी माहिती म्हणजेच sant namdev information in marathi language बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला sant namdev information in marathi म्हणजेच sant namdev in marathi , information about sant namdev in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment