शिवजयंती मराठी माहिती 2021 | Shiv Jayanti Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण शिवजयंती मराठी माहिती म्हणजेच shiv jayanti information in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला shivaji maharaj jayanti म्हणजेच chhatrapati shivaji maharaj jayanti विषयी पोस्ट सुरू करूया ……….

शिवजयंती मराठी माहिती | shiv jayanti information in marathi | shivaji maharaj jayanti

शिवजयंती मराठी माहिती 2021 | Shiv Jayanti Information In Marathi

हिंदवीस्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे अराध्य दैवत,अजेय सेनांनी, जाणता राजा,प्रजादक्ष,रयतेवर जीवापाड प्रेम करणारे,या भूतलावर कदाचितच असा कोण असेल ज्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहिती नसेल, ज्यांना ‘महाराष्ट्र गौरव नव्हे ‘ आख्या हिंदुस्थानचा गौरवअसे ही म्हंटले जाते.ते जगातील सर्वोत्तम योध्दा व शासक होते.रायरेश्वराची शपथ घेऊन, 1645 साली,मूठभर मावळ्यानीशी प्रचंडगड जिंकून शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात “हिंदवीस्वराज्य” म्हणजेमराठा साम्राज्याच तोरण बांधलं. शिवाजी महाराजांनी अनेक वर्षे चार शाह्या, व मुघलांच्या विरुद्ध संघर्ष केला आणि त्यांना धूळ चारली.

शिवाजी महाराजांच्या जन्म दिवशी 19 फेब्रुवारी भारतात व देशविदेशात शिव जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रात शिव जयंतीच्या दिवशी सरकार सार्वजनिक सुट्टी जाहीर करते. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील शूर व पराक्रमी शासाकांपैकी एक होते. त्यांना त्यांच्या चतुर बुद्धीमुळे ओळखले जाते.त्यांनी “गनिमीकावा” ह्या कमी सैन्यानिशी व कमी वेळात काही हालचाल करण्या अगोदर लाखो दुष्मन सैनिकांचा संपूर्ण पाडाव करून विजय मिळवणे हे युद्धतंत्र ह्या जगाला दिले.

छत्रपती शिवाजी महाराज्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्यावर झाला होता.तेथील शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव आई जिजाबाईनी “शिवाजी”असे ठेवले. मराठा साम्राज्यचा पाया रचण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजाना जाते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला “शिव जयंती” आणि “शिवाजी जयंती” असे ही म्हंटले जाते. महाराष्ट्र मध्ये शिव जयंती पारंपरिक पद्धतीने व उत्सहानें साजरी केली जाते. महाराष्ट्र मध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. शिवाजी महाराजांना त्यांच्या शौर्य आणि युद्धरणनितीसाठी सुद्धा ओळखले जाते.

शिवाजी महाराजांच लग्न १४ मे, १६४० साली सईबाई निंबाळकर यांच्या सोबत झाल होत. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना गनिमीकाव्याने युद्ध कसे जिंकायचे हे शिकवले. शिवाजी महाराजांनी माराठी मावळ्यांची मोठी सेना बनवली.त्यांच्या सैन्यात जातीभेद नव्हता.शिवाजी महाराजांच्या सेने मध्ये अनेक मुस्लिम शिपाही पण होते. त्यांचे महत्त्वाचे ध्येय म्हणजे उपद्रवी व रयतेला त्रास देणाऱ्या मुघल सेनेला हरवून सुराज्य स्थापित करणे. शिवाजी महाराज स्त्रियांचा फार आदर करत होते. शिवाजी महाराज स्त्रियांच्या विरुद्ध होणाऱ्या हिंसा, शोषण आणि अपमानाच्या विरोधात होते.स्वराज्यात स्त्रियांच्या अधिकाराच उल्लंघन केल्यावर शिक्षा मिळत असे.

शिवाजी महाराज हे असे पाहिले राज्या होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्राच्या स्वरक्षणा साठी स्वतःचेआरमार उभे केले होते.त्यांनी सिंधुदुर्ग सारख्या अनेक जलदुर्गांची बांधणी केली.भारतीय आरमाराचे जनक असेही त्यांना म्हणतात. 6 जून १६७४ साली शिवाजी महाराज राज्याभिषेक करून सिंहासनाधिश्वर झाले व या अखंड हिंदवी स्वराज्याचे छत्रपती. त्या वेळी फारसी भाषा जास्त उपयोगात असल्यामुळे शिवाजी महाराजांनी न्यायालय आणि प्रशासनात मातृभाषा मराठी आणि संस्कृतच्या उपयोगाला चालना देण्याचा निर्णय घेतला.येथील शेतकरी व कष्टकरी रयतेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या. शस्त्र कारखाने उभे करून राज्याचा सुरक्षेत कोणतीही कसूर ठेवली नाही.त्यांनी येथे रयतेला सुखी व समाधानी ठेवणारे रामराज्य निर्माण केलं.

छत्रपती शिवाजी महाराजयांच्या जयंतीचा इतिहास असा आहे की: छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० साली पुण्यामध्ये महात्मा जोतिबा फुलेनी केली. त्यांनी पुण्या वरून १०० किलोमीटर लांब रायगडला जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला होता. नंतर स्वतंत्रता सेनानी बाळ गंगाधर टिळक यानी 1895 नंतर जयंती साजरा करण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकून त्यांनी शिवाजी महाराजांच्या देव, देश आणि धर्मकार्याला घराघरात पोहोचवले. त्यामागे त्यांची ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध ऊभे राहून शिवाजी महाराज जयंतीच्या माध्यमाने स्वतंत्रता आंदोलन च्या वेळी लोकांनां एकत्र आणण्याची मुख्य भूमिका होती. शिवाजी महाराजांच शौर्य आणि योगदान लोकांना धैर्य देईल म्हणून दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.

शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ दर वर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित केल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दर्शविणारे नाटक व रोडशो अनेक स्थळांवर आयोजित केले जातात. त्या दिवशी सरकारी अधिकारी अनेक ठिकाणी भाषण देतात. त्या दिवशी शाळेत त्यांच्या वेशभूषाचे आयोजनही केले जाते. महाराष्ट्राची लोक त्याला त्यांचा गौरव आणि सन्मान म्हणतात. शिवाजी महाराजांच्या वाढणाऱ्या ताकतीने भयभीत झालेल्या विजापूरच्या आदिलशहाने शिवाजी महाराजांना जरब बसवण्यासाठी त्याने शिवाजीचे वडील शहाजीराजांना कैदेत टाकले .ही बातमी शिवाजींराजांना कळताच महाराज उग्र झाले. शिवाजी महाराजांनी युक्तीने,राजकीयधोरण आणि शौर्यच्या अधारावर त्यांनी त्यांच्या वडिलांना कैदेतून मुक्त करण्यास भाग पाडले.

तेव्हा विजापूरच्या शासाकाने शिवाजी महाराजांना जीवित किंवा मृत पकडण्याचे आदेश देऊन, त्याचा बलाढ्य सेनापती अफजल खानला स्वराज्यावर 60 हजार फौजेनिशी व अफ़ाट दारुगोळा देऊन पाठवले. त्याने रयतेचा छळ व खूप नासधूस ही केली.बंधुत्व आणि सलोख्याच्या खोट्या नाटकाने त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांची गळाभेट घेऊन ठार मारण्याचा विचार केले परंतु त्यांनी हातात घातलेल्या वाघनखांनी तो मारला गेला. हे बघून त्याची सेना घाबरून पळाली.

त्यांच्या या विजयामुळे त्यांना महान व शूरराष्ट्रपरुषांच्या रूपामध्ये सगळीकडे ओळखले जाऊ लागले.त्यानंतर शाहिस्ते खानाचा पराभव, आग्र्याहून सुटका,असे एकाहून एक भीमपराक्रम त्यांच्या नावावर आहेत.या सर्व कार्यात त्यांच्या आऊसाहेबांनची त्यांना खूप मदत झाली.असा हा जाणता राजा, आदर्शपुत्र,गरिबांचा कैवारी,रयतेच राज्य स्थापनकर्ते,आपल्या रयतेला दुःख सागरात लोटून वयाच्या अवघ्या बावनव्या वर्षी 3 एप्रिल 1680 ला रायगडावर स्वर्गवासी झाले. ।ह्या भूमंडळाचे ठाई। हिंदु धर्म राहिला काही।तुम्हां कारणे। ।।जय शिवराय।। ।।राजें मनाचा मुजरा ।।

निष्कर्ष

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आज आपण शिवजयंती मराठी माहिती म्हणजेच shiv jayanti information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . तुम्हाला shivaji maharaj jayanti म्हणजेच chhatrapati shivaji maharaj jayanti ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू शकता . व ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ……….

Leave a Comment